अंक दुसरा (उत्तरार्ध) : सत्यशील खरे की खोटे? (इम्पॉर्टन्स ऑफ बीइंग अर्नेस्ट)
सत्यशीलनं मला काल अगदी बरोब्बर सांगायचं तर पाच वाजून एकोणचाळीस मिनिटांनी प्रपोज केलं होतं. (तिची डायरी काढते) बघ. सॉरी मधुरा, तुला थोडंस वाईट वाटलं तरी चालेल, पण सत्यशीलवर पहिला हक्क माझा आहे. मधुरा - शाल्मली, मला एक गोष्ट लक्षात आणून द्यायलाच लागणार आहे तुझ्या. तुला थोडा त्रास होईल, पण त्याला आता माझा इलाज नाहीये. हे बघ, सत्यशीलनं मला तुझ्यानंतर प्रपोज केलंय ह्याचा अर्थ, मला बघितल्यावर सत्यशीलचं मन बदललं असाच होतो
.......